बेळगाव / प्रतिनिधी 

आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांनी संकलन केलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमाप्रश्न या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात झाले. या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र तासगाव कवठेमंहाकाळचे आमदार रोहित आर.आर. पाटील हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले, चळवळ टिकली पाहिजे चळवळ टिकवण्यासाठी युवा समितीने पुस्तकाच्या रूपाने आणि इतर माध्यमातून चालविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद  आहे.  सीमाप्रश्न लवकर संपला पाहिजे विद्यार्थ्यांच्या पर्यंत आणि युवकांच्या पर्यंत सीमाप्रश्न पोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने संकलन केलेल्या केलेले हे पुस्तक समस्त मराठी भाषिकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि आपण स्वतः आपल्या मतदारसंघातील प्रत्येक शाळेतील ग्रंथालयामध्ये सदर पुस्तक पोहोचवणार आहे अशी ग्वाही दिली. भाषावार प्रांतरचनेनंतर अन्यायाने कर्नाटकात डांबलेला हा सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा म्हणून सात दशके लढा सुरू आहे.  कुठेतरी या लढ्याचा अंत झाला पाहिजे आणि हा  सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे यासाठी तीव्र लढा देणे आता गरजेचे असून मी आमदार म्हणून यापुढे महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत आणि चळवळीमध्ये सक्रिय सहभागी राहीन अशी ग्वाही यावेळी रोहित पाटील यांनी बोलताना दिली. 

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, समिती नेते रमाकांत कोंडुसकर आर. एम.चौगुले, मदन बामणे, अमित देसाई होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी रोहित पवारांनी दिलेल्या धावत्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि सर्वांचे आभार मानले.

यावेळी माजी महापौर सरिता पाटील, शिवानी पाटील, माजी नगरसेवक राजू बिरजे, विजय भोसले, राकेश पलंगे माजी उपमहापौर संजय शिंदे, किरण परब, उमेश पाटील, लक्ष्मण शिंदोळकर, युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, गुंडू कदम, सिद्धार्थ चौगुले, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, सतीश पाटील, बाळू जोशी, संतोष कृष्णाचे, उमेश कुर्याळकर,भावेश बिर्जे, किरण हुद्दार, महेश जाधव, प्रतीक पाटील, ॲड. वैभव कुट्रे, ज्ञानेश्वर मनुरकर, बसवंत घाटेगस्ती,  सागर सांगावकर,  यल्लापा पाटील, सुनील बोकडे,विकास भेकणे, आकाश भेकणे, सचिन पाटील,  साईराज जाधव, साईनाथ शिरोडकर, सुरज चव्हाण, सौरभ जोशी, अश्र्वजित चौधरी,  अजय सुतार, प्रवीण धामणेकर, सौरभ तोंडले, अक्षय बांबरकर, सुशील म्हातुंगडे, ओंकार नारळकर, निखिल देसाई, दर्शन घाटेगस्ती, विकास लगाडे, रोहन कंग्राळकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी सूत्रसंचालन केले