विद्यार्थिनींना पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविताना
शिवाजी सायनेकर व गणपती पाटील बाजूला
प्रा. सी. एम. गोरल, एम. बी.  बाचीकर,
नागोजी गावडे व प्रा. रणजीत कांबळे

येळ्ळूर, ता. ६ :  येळ्ळूरग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात येळ्ळूर परिसरातील व सीमा भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी एम गोरल, लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे  नागोजी गावडे, गणपती पाटील होते.

सीमा भागात मराठी विषयात प्रथम कु. प्रेरणा पाटील (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) व कु. वैष्णवी हलगेकर (शिवठाण हायस्कूल, खानापूर) या दोघींना समान गुण मिळाल्यामुळे बक्षीस विभागून देण्यात आले. सदर पाच हजाराचे  बक्षीस प्रत्येक वर्षी प्रा. वाय. एन. मेणसे यांच्याकडून दिले जाते. श्री. शिवाजी विद्यालय केंद्रात प्रथम कु. नम्रता कुंडेकर (महाराष्ट्र हायस्कूल, येळळूर), द्वितीय कु. साधना देसाई (महाराष्ट्र हायस्कूल, येळळूर) तृतीय  कु.करुणा मजुकर चांगळेश्वरी हायस्कूल, येळळूर) सदर बक्षीसे बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर किरण धामणेकर यांच्याकडून प्रतिवर्षी दिली जातात. तसेच श्री शिवाजी विद्यालय केंद्रात,मराठी विषयात प्रथम कु. नम्रता कुंडेकर (महाराष्ट्र हायस्कूल,येळळूर) कु. दितिशा पाटील (नेताजी हायस्कूल, सुळगे) द्वितीय कु. साधना देसाई, वैष्णवी पाटील, करुणा मजुकर, तृतीय क्रमांक कु. वैभवी कुगजी (शिवाजी विद्यालय, येळळूर ) कु. स्नेहल कुंडेकर (शिवाजी विद्यालय, येळळूर) सदर बक्षीसे प्रा. वाय.एन.मेणसे यांच्याकडून प्रतिवर्षी देण्यात येतात. वरील सर्व विद्यार्थिनींना रोख पारितोषिके व  साहित्य संघाचे स्मृतिचिन्ह देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांनी केले.