हुक्केरी / वार्ताहर 

अचानक समोरून आलेल्या दुचाकीला धडक टाळण्याच्या प्रयत्नात मालवाहक टेंपो उलटल्याने ३० हून अधिक नरेगा मजूर गंभीर जखमी झाले. हुक्केरी तालुक्यातील होसूर गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर घटना ही घटना घडली. या अपघातात मालवाहक टेंपोतून प्रवास करणारे ३० हून अधिक नरेगा मजूर गंभीर जखमी झाले आहेत. तर एका महिलेच्या डोक्याला आणि हातापायाला दुखापत झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमी झालेले सर्व मजूर यमकनमर्डी गावातून हिडकल धरणावर नरेगाच्या कामासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे. जखमींना बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.