- खानापूर तालुक्याच्या लिंगनमठ गावातील घटना
- स्मशानभूमीकडे जाण्यासाठी वाट नसल्याने गावकरी आक्रमक
खानापूर / प्रतिनिधी
स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी मुख्य रस्त्याच्या मधोमध मृतदेह ठेवून निषेध केला. बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील लिंगनमठ गावात ही घटना घडली.
खानापूर तालुक्यातील लिंगनमठात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. अनेक ग्रामस्थांनी ही बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली असली तरी अधिकाऱ्यांनीच दखल घेतलेली नाही. दरम्यान दि. बुधवार दि. २२ जानेवारी रोजी एका अनाथ व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला. तेव्हा स्मशानात जाण्यासाठी रस्ता शोधावा लागला. ही बाब दुपारी ३ वा. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्या ठिकाणी न आलेल्या तहसीलदार व उपतहसीलदारांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
0 Comments