(संग्रहित फोटो) 

खानापूर / प्रतिनिधी 

कर्नाटक सरकारने राज्यभरात ४१ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून, खानापूर पोलीस स्थानकाचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून लालसाब हैदरसाब गवंडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान माजी मंत्री सी.टी.रवी यांच्या प्रकरणानंतर खानापूर पोलीस स्थानकात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे हे पद रिक्त होते. आता लालसाब हैदरसाब गवंडी या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. 

लालसाब गवंडी हे यापूर्वी सीआयडी विभागात कार्यरत होते. त्यांच्या अनुभवामुळे त्यांची खानापूर पोलीस स्थानकात नियुक्ती करण्यात आली आहे. खानापूर परिसरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा मजबूत करण्यावर ते भर देतील. त्यांच्या नियुक्तीने स्थानिक प्रशासनाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा आहे.