• दर महिन्याला १० हजार रुपयांचे मानधन मंजूर 

बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत आशा वर्कर्सची बैठक यशस्वी झाली असून, आशा वर्कर्सना दर महिन्याला १०,००० रु. मानधन देण्याचे शासनाने   मान्य केले आहे.

यामध्ये राज्य सरकारकडून दरमहा ५००० रुपये आणि केंद्र सरकारच्या ३४ सेवांना दिल्या जाणाऱ्या मानधनासह दरमहा १० हजार रुपये दिले जाणार आहेत. 

पोर्टलमध्ये माहितीची नोंदविण्याच्या येणाऱ्या समस्येकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी पोर्टलमध्ये सुधारणा करून समस्या सोडविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठकीत सांगितले, आशा कार्यकर्त्यांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास त्यांना दर महिन्याची रजा एकत्र करून तीन महिने मानधन थांबवता येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठकीत सांगितले.

अर्थसंकल्पपूर्व बैठकीदरम्यान आशा वर्कर्ससोबत बैठकही घेतली जाणार आहे. सरकार तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लढा हा घटनात्मक अधिकार आहे, सरकार लोकशाही संघर्ष दडपून टाकणार नाही.