• हिरबागेवाडी टोल नाक्यानजीक घटना 

बेळगाव  / प्रतिनिधी 

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी नाक्याजवळ कारचा टायर फुटून चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची दुचाकीला धडक बसली. ही धडक इतकी जोराची होती की, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू   झाला.

अपघातग्रस्त कार धारवाडहून बेळगावच्या दिशेने येत होती, तर दुचाकीस्वार कुकडोळीच्या दिशेने जात होता. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे पूर्ण नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. कार चालक महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली आहे.