बेळगाव / प्रतिनिधी 

हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी येथे मालवाहू वाहन उलटून जखमी झालेल्या कामगारांच्या प्रकृतीची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी विचारपूस केली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींचा वैद्यकीय खर्च सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी येथे मालवाहू वाहन पलटी झाल्याने ३५ हून अधिक नरेगा कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव बीम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बीम्स रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे सांगितले. जास्त काम असल्यास ते इतरत्र जात आहेत. केडीपीच्या बैठकीत चर्चा झाली असून जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू केल्यानंतरही तेथे विद्यमान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. येथील विभाग तातडीने स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी आमदार नागराज यादव, बेळगावचे पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि.पं. सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, बेळगाव बीम्सचे संचालक अशोक शेट्टी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगाळे, किरण राजपूत, सिद्धू सुणगार आदी उपस्थित होते.