- नवीलूतीर्थ धरणाजवळ मलप्रभा नदीत बुडून मृत्यू
सौंदत्ती / वार्ताहर
सौंदत्ती यल्लम्मा यात्रेत आलेल्या आलेल्या एकाच कुटुंबातील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहरात नवीलूतीर्थ धरणाजवळ मलप्रभा नदीत ही दुर्दैवी घटना घडली. वीरेश कट्टीमणी (वय १३) आणि सचिन कट्टीमणी (वय १४) अशी मृत मुलांची नावे असून ते दोघेही गदग जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
सौंदत्ती यल्लम्मा जत्रा संपवून दुपारी मुनवळ्ळी धरणात आंघोळीसाठी गेलेली मुले पाण्यात बुडून बेपत्ता झाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि सौंदत्ती पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रभाकर एस. धर्मट्टी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध सुरू केला. या दरम्यान एका मुलाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. ही घटना सौंदत्ती पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.
0 Comments