गदग : कर्नाटकाचा ‘लक्कुंडी: शिल्पकलेचा झंकार’ असे नाव असलेला चित्ररथ दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथवर होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी सज्ज झाला असून या चित्ररथाचा अनावरण सोहळा आज पार पडला.
दरवर्षी कर्नाटक माहिती आणि जनसंपर्क विभागच्यावतीने वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथाची मांडणी केली जाते. यंदाचा चित्ररथ हा कर्नाटक राज्याच्या गदग जिल्ह्यातील लक्कुंडी येथील शिल्पकलेवर आधारित असून या चित्ररथाच्या माध्यमातून ऐतिहासिक मंदिरे आणि शिल्पकलेच्या महतीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना मंत्रालयाचे आयुक्त हेमंत एम. निंबाळकर म्हणाले, कर्नाटक राज्याने दिलेल्या सशक्त प्रोत्साहनामुळे ‘लक्कुंडी: शिल्पकलेचा झंकार’ हा चित्ररथ तयार करण्यात आला असून या चित्ररथाच्या माध्यमातून शंभर वर्षांपूर्वीच्या गदग-लक्कुंडी ऐतिहासिक मंदिरे आणि शिल्पकलेच्या वैभवाचे चित्रण करण्यात आले आहे.
यापूर्वी पथसंचलनात कर्नाटक राज्याने १५ वेळा सहभागी होऊन विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. सर्व धर्मांना समान वागणूक देणाऱ्या आपल्या राज्यात सर्व धर्मांची मंदिरे आहेत. यापैकी एक म्हणजे गदगमधील लक्कुंडी हे ऐतिहासिक शहर. अहिंसेचे निवासस्थान. शिल्पकलेचे जन्मस्थान असलेल्या लक्कुंडीमध्ये शैव, जैन आणि वैष्णव मंदिरे आहेत.
कलात्मकतेने सजलेली येथील मंदिरे या स्थिर प्रतिमेत अशा प्रकारे चित्रित केली आहेत. राज्याकडून सादर केला जाणारा चित्ररथ २६ जानेवारी रोजी सर्वांना मोहित करेल असा त्यांना विश्वास हेमंत निंबाळकर यांनी व्यक्त केला.
एकूण चार विषयांपैकी ‘लक्कुंडी: शिल्पकलेचा झंकार’ हा विषय तज्ञ समितीने एकमताने अंतिम केला. यावर आधारित, या वर्षीच्या सशक्त चित्ररथावर लक्कुंडीच्या मंदिरांनी कर्नाटक राज्याच्या श्रीमंत सांस्कृतिक परंपरेला प्रतिबिंबित केले आहे, असे आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी सांगितले.
0 Comments