- ३३ कार जळून भस्मसात ; कोट्यवधींचे नुकसान
- कोरड्या गवताने पेट घेतल्याने पसरली आग
वेर्णा : औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास येथील रेनो कार सर्व्हिस सेंटरच्या बाहेर सर्व्हिसिंगसाठी ठेवण्यात आलेल्या जवळपास ३० कार या आगीमध्ये भस्मसात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एक डेमो कार होती. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. जिथे कार ठेवण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी कोरडे गवत आहे. त्यामुळे गवताला आग लागल्यावर तेथील वाहनांनी पेट घेतला. यामध्ये २२ स्कोडा व ११ रेनो अशा एकूण ३३ कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
0 Comments