• भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांविरोधात धडक कारवाई  

बेळगाव / प्रतिनिधी 

गेल्या तीन दिवसांपूर्वी बेळगावातील काही प्रतिष्ठित व्यापारी आणि व्यावसायिकांच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे घातल्याची घटना ताजी असतानाच आज शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी पहाटे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पुन्हा भ्रष्टाचाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे.

बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याच्या तक्रारीवरून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पहाटे सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. बेळगाव उपनिबंधक सचिन आणि रायबागचे पशुवैद्यकीय अधिकारी संजय यांच्या घरांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिली आहे.