बैलहोंगल / वार्ताहर
बैलहोंगल तालुक्यात असलेल्या हिरेमठातील शिवबसप्पा अज्जनवर मंदिरात चोरी झाली असून चोरट्यांनी मंदिरातील तब्बल ३० तोळे सोन्याच्या दागिने लांबविले आहेत. रविवार (दि. ५) जानेवारी रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेत चांदीची देवतेची मूर्ती, नंदी, छडी, यासह विविध मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे.
शनिवारी मंदिरातील पूजा आटोपल्यानंतर मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरातील ३० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. रविवारी पहाटे मंदिरात पूजा सुरू असताना चोरीची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस श्वानपथक व बैलहोंगलचे पोलीस निरीक्षक पीव्ही सलीमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.
0 Comments