बेळगाव : सदाशिवनगर मेन क्रॉस येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूलमधील इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थी - विद्यार्थीनींची मैदानी सहल शनिवार (दि. ४) जानेवारी रोजी काढण्यात आली. 

शालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून काढलेल्या या सहलीच्या निमित्ताने येळ्ळूर येथील राजहंस गडाला भेट देण्यात आली. याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थांना छ. शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. 

यावेळी शिक्षिका वैभवी भोसले, क्रीडा शिक्षक दीपक पाटील यांच्यासह अनेक शिक्षक - शिक्षिका उपस्थित होते. सहलीच्या व्यवस्थापनासाठी मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.