खानापूर : मौजे, चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील रहिवासी राजाराम लक्ष्मण पाटील (वय ८६) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे हलशी येथील सरकारी मराठी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. तसेच त्यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील व आनंदगड हायस्कूल चे क्रीडा शिक्षक व गणेबैल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक किरण पाटील यांचे ते वडील होत. अंत्यसंस्कार आज सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
0 Comments