गुंजी / वार्ताहर
आपली भाषा आणि संस्कृती टिकावी म्हणून विश्व भारती कला व क्रीडा संघटना गेल्या वर्षापासून खानापूर तालुक्यात कार्यरत आहे. मातृभाषेतील सर्व सरकारी शाळा टिकाव्या म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्याचबरोबर मातृभाषा व संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने या संघटनेतील महिलांच्या विचार विनिमयाअंती महिला मेळावा आणि हळदी कुंकू कार्यक्रम घेण्याचा निर्णय आखण्यात आला आहे. सदर कार्यक्रम खानापूर येथील रवळनाथ मंदिरात सोमवार दिनांक २० रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात हळदी कुंकू बरोबरच लहान मुलांना मातृभाषेची आवड निर्माण करून त्यांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी सर्व महिलांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा. अशी माहिती विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली आहे.
0 Comments