बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्याच्या नागेनहट्टी गावातील शहीद जवान रवी तलवार यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागालँडजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात शहीद झालेले जवान रवी तलवार यांचे पार्थिव शनिवार (दि. ११) जानेवारी रोजी त्यांच्या मूळ गावी नागेनहट्टी येथे दाखल झाले. यानंतर मोकळ्या वाहनातून मिरवणुकीने पार्थिव गावच्या स्मशानभूमीत नेऊन शासकीय इतमामात, बंदुकीच्या फैरी झाडून अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारापूर्वी पार्थिवाच्या अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून जात असताना दरीत कोसळून झालेल्या अपघातात रवीसह तीन जवान शहीद झाले होते. शहीद रवी गेल्या १६ वर्षांपासून नागालँड रायफल्समध्ये सेवा बजावत होते.
0 Comments