सुळगा (हिं.) / वार्ताहर 

उदो गं आई उदोच्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करीत कोनेवाडी येथे रेणुका देवी यात्रा व मारग  मळण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुवारी सायंकाळी कोनेवाडी येथील भाविक कोन्वेरनाथ मंदिरा समोरील मळ्यात दाखल झाले होते. 

शुक्रवार दि. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी यात्रेला सुरुवात झाली. सकाळपासूनच यात्रेच्या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवीचे दर्शन घेऊन भाविक देवस्की महिला परडी घेऊन बसलेल्या ठिकाणी नमस्कार करण्यासाठी गर्दी केली होती.

तर सौंदत्ती यल्लमा डोंगर येथून आलेल्या भाविकांनी त्याच ठिकाणी आपापल्या नातेवाईक व मित्रमंडळींना प्रसादाची सोय केली होती. दुपारी देवीच्या गदगेसमोर गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर देवीला उत्कार घालून भंडाऱ्याची उधळण करीत वाजत गाजत उदो गं आई उदोच्या जयघोषात भाविक गावात दाखल झाले.

यावेळी कोनेवाडी ग्रामस्थ, माता - भगिनी, युवक - युवती, यांच्यासह लहान मुलांच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्साहात पार पडली.