येळ्ळूर, ता. १४ : येथील श्री शिवाजी विद्यालयामध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव दक्षिण व गटशिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव ग्रामीण यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी विद्यार्थ्याकरिता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळळी  होते.  प्रेरणा कार्यशाळेत परिसरातील विविध शाळांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सी .एम. गोरल व डॉ.  अरुणा पावशे या होत्या. यावेळी बेळगाव ग्रामीणचे बीआरसी कोऑर्डिनेटर डॉ. एम. एस. मेदार व  एसएसएलसी नोडल ऑफिसर सुनील कुट्रे, संपन्न मूल्य व्यक्ती म्हणून सरदार हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले, एस बी मजुकर, श्रीमती एम. डी. देसाई यांनी काम पाहिले. या प्रेरणा कार्यक्रमांमध्ये येळ्ळूर विभागातील  एकूण नऊ हायस्कूलचे 250 विद्यार्थी उपस्थित होते.  विद्यार्थ्यांना अरुणा पावशे, प्रा. सी. एम गोरल डॉ. एम. एस. मेदार, सुनील कुट्रे यांनी दहावीच्या परीक्षेसाठी तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय नंदीहळळी बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनो निर्भयपणे परीक्षेची तयारी करा, कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगू  नका, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला होऊल, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कठोर परिश्रम आणि सातत्य तुमचे भविष्य घडवितात. यासाठी रोज ठराविक वेळ अभ्यास करा, यश तुम्हाला नक्की मिळेल अशा  शुभेच्छा दिल्या. पहिल्या सत्रामध्ये संपन्न मूल्य व्यक्ती  रणजीत चौगुले यांनी  मराठी व  समाजविज्ञान विषय ब्लू प्रिंट, प्रश्नपत्रिका नमुना, कठीण प्रश्न सोपे करून कसे लिहिता येतात ही माहिती दिली. दुपारच्या सत्रात श्रीमती एम. डी. देसाई, यांनी विज्ञान विषयाचे मार्गदर्शन केले, तर एस. बी. मजूकर यांनी गणितविषयाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याधापक एम. बी. बाचीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.बी .मजूकर यांनी केले, तर आभार एच. एस. लोकळूचे यांनी मानले. उदघाटन कार्यक्रमास मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे, ए.डी.धामणेकर, डी. ए. खोरागडे, टी. वाय.भोगण, व्ही. एल. पाखरे, धबाले, रेखा पाटील, विद्या पाटील आदी यावेळी उपस्थित होते.