• रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्यावतीने आयोजन  

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्यावतीने सेंट जर्मेन इंडियन स्कूल, भडकल गल्ली, बेळगाव येथे दोन दिवसांच्या नेतृत्व कौशल्य विकास शिबीर अर्थात रिलाचे (ROTARY YOUTH LEADERSHIP AWARDS) चे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लबद्वारे तरुणांमधील नेतृत्त्व कौशल्य विकसित करण्यासाठी आयोजित केलेला हा एक उपक्रम आहे.

या कार्यक्रमाला झोनल आरटीएन.हर्ष शिंदे व श्री. उदय इडगल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा आरटीएन  रुपाली जनाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आरटीएन हर्ष यांनी रिला व्यक्तिमत्व सुधारण्यास कशी मदत करते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच सदर दोन दिवसांत सर्वानी त्याचा फायदा करुन घ्यावा. या २ दिवसांत इ. ६ वी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

दिवस :

१. लीडरशिप मास्टरक्लास : झोनल आरटीएन.हर्ष शिंदे 

२. खगोलशास्त्र अंतर्दृष्टी  रात्रीचे आकाश समजून घेणे : श्री.आनंद हुक्केरी 

३. आंतरिक शांती  ध्यान सत्र : संजना पंडित  

दिवस २:

१. तालात पाऊल : नृत्य श्रीमती अर्चना हुल्लिकट्टी यांची कार्यशाळा 

२.आत्मसंरक्षणाद्वारे आत्मविश्वास : सहाना एस. आर. 

३. द जॉय ऑफ क्रिएटिंग: आर्ट अँड क्राफ्ट वर्कशॉप : आरटीएन. सविता वेसणे  

"सशक्त मन, शांत हृदय" या थीम अंतर्गत विद्यार्थ्यांनी संवाद साधून सत्रांमध्ये आपली प्रतिभा दाखवली.रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण सचिव आरटीएन शीतल चिलमी, न्यू जनरेशन डायरेक्टर आरटीएन ॲड. दिव्या मुदिगौडर, इव्हेंट चेअरमन आरटीएन. ज्योती कुलकर्णी, आरटीएन. सुरेखा मुम्मीगट्टी, आरटीएन. शीला पाटील, आरटीएन. सविता वेसाने, आरटीएन. ॲड. विजयलक्ष्मी, आरटीएन. पुष्पा पर्वतराव, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती, शिक्षक आणि 6 वी आणि ७ वी. विद्यार्थी उपस्थित होते. 

एमओसी आरटीएन.विजयालक्ष्मी मन्निकेरी यांनी केले.