बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्षपदी सुभाष पाटील यांची यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा माजी आमदार तथा भाजपचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजशेखर शिलवंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

बेळगाव ग्रामीण जिल्ह्याच्या नूतन भाजप अध्यक्षपदी सुभाष पाटील यांची निवड झाल्याची घोषणा माजी आमदार तथा भाजपचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजशेखर शीलवंत यांनी आज भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर ते बोलतांना म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीवर प्रचंड विश्वास असलेला पक्ष आहे, जिल्ह्य़ात एकूण २११५ निवडणूक बूथ ४१८ पक्षाची सत्ताकेंद्रे, ६६ महाशक्ती केंद्रे, २११५  बूथवार बूथ कमिट्या स्थापन केल्या आहेत. बेळगाव शंभर टक्के पक्षीय बूथ कमिटी स्थापन करणारा राज्यातील पहिला जिल्हा आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कोअर कमिटीने बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेबाबत सर्व सदस्यांची मते जाणून घेतली, त्यानंतर या अंतर्गत नऊ संघटनात्मक मंडळांच्या अध्यक्षांच्या एकमताने अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर बेळगाव ग्रामीण जिल्ह्याच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी सुभाष पाटील यांची एकमताने घोषणा करण्यात आली.

नूतन जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले सुभाष पाटील म्हणाले मला जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवडून दिले त्या सर्वांचे आभार. तीन वर्ष मी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचा दौरा करून पक्षाच्या संघटनेसाठी बूथ स्तरावरुन प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, विश्वनाथ पाटील, अरविंद पाटील, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण तापसी, निवडणूक सहसंयोजक ईराण्णा चंद्रगी, जिल्हा सरचिटणीस धनश्री देसाई, राज्य माध्यम समिती सदस्य एफ.एस सोशल मीडिया सदस्य नितीन चौगले, एस.सी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यल्लेश कोलकार यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.