बेळगाव : सदाशिवनगर येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूलमध्ये नुकताच "व्हिजिटेबल अँड फ्रुट्स" डे साजरा करण्यात आला. फळे आणि भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे मुलांना बाल वयातच शिक्षणाच्या माध्यमातून याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. या उद्देशाने एलकेजी आणि युकेजीच्या विद्यार्थांसाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
यामध्ये विविध भाज्या आणि फळांची वेशभूषा केलेल्या एलकेजी आणि युकेजीच्या छोट्या विद्यार्थी - विद्यार्थीनींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यावेळी भाज्या आणि फळांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थी - विद्यार्थीनींनी भाषण केले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या, शिक्षक - शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Admission Open :
From : Playgroup to 8th Standard
(CBSE Pattern)
Aryans World School
Sadashivnagar, Main Cross, Belgavi
Contact : 08496034488
0 Comments