बेळगाव : राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ शरीरसौष्ठव स्पर्धा बेळगाव येथे दि. १४, १५ व १६ जानेवारी रोजी होणार आहे. पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांना स्पर्धेच्या आयोजन समितीचे सह-अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. 

या स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यापूर्वीच संमती दर्शवली आहे. पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनी सदर बाब अभिमानास्पद  असून सहअध्यक्ष पदाला संमती दर्शवून स्पर्धा यशस्वी करण्याची ग्वाही दिली.  या वेळी केएबीबीचे अध्यक्ष अजित सिद्दण्णावर. मिस्टर इंडिया रेल्वे अधिकारी सुनील आपटेकर यांनी स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली.  यावेळी बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे पदाधिकारी गंगाधर, हेमंत हावळ, सुनील पवार, विकास कलघटगी, प्रकाश कालकुंद्रीकर उपस्थित होते.