बेळगाव / प्रतिनिधी
हलगा सर्व्हिस रोडलगत नाल्यांमध्ये अडथळ्यामुळे सांडपाणी साचत असून समस्या निर्माण होत असल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
बेळगाव तालुक्यातील हलग्याजवळ सर्व्हिस रोडला लागून असलेल्या मागील मैदानात सांडपाणी साचल्याने दुर्गंधी येत आहे. महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष देऊन समस्या सोडवली नाही, तर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. हलगा ग्रामपंचायतही याकडे लक्ष देत नाही. या नाल्यात सुवर्णसौधाचे पाणीही वाहत असते. हा प्रश्न सोडविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
0 Comments