- सहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान
अथणी / वार्ताहर
अथणी तालुक्यातील नदी इंगळगाव येथे अथणी पोलीस स्थानकाच्या हद्दीत तोडलेला ऊस ट्रॅक्टरमध्ये भरताना ट्रॅक्टरला आग लागून ट्रॅक्टर व ट्रॉली जळून खाक झाले. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेत ट्रॅक्टर पूर्णपणे जळून खाक झाला असून सहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी आग विझवण्याची धडपड केली मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना अपयश आले. प्राप्त माहिती नुसार तोडलेला ऊस कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे पाठवण्यात येत होता.
0 Comments