• आजी - माजी आमदार व ग्रामस्थांच्यावतीने जि. पं. सीईओना निवेदन

खानापूर / प्रतिनिधी 

अवरोळी बिळकी ग्रामदेवी जत्रेसाठी १ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानासाठी आजी - माजी आमदार व ग्रामस्थांच्यावतीने जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

अवरोळी बिळकी ग्रामदेवी  जत्रेनिमित्त  व गावाच्या विकासासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर करावे, या मागणीचे निवेदन आमदार विठ्ठल  हलगेकर व माजी आमदार तथा बीडीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. या विनंतीला प्रतिसाद देत अधिकाऱ्यांनी काही दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष कल्लाप्पा हेमोजी, भाजप जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष ज्योतिबा भरमन्नवर, अशोक कोडोली, यशवंत कोडोली, रुद्रप्पा शिवप्पानवरा, नागप्पा नागन्नवर, अर्जुनगौडा पाटील, राजगौडा पाटील, शांताप्पा पेजोली, रुद्रप्पा कोडोली, सुद्रप्पा कोडोली, मनुनाथ कोडोली, मनमोहन कोडोली, रुद्रप्पा चवरागी, मंजुनाथ पाटील, राजकुमार तोपखाने, विठ्ठल देवनूर, सुदीप पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.