बेळगाव / प्रतिनिधी
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्यातर्फे सुरू झालेली पालखी परिक्रमा बुधवारी सायंकाळी ५ वाजता स्वामी समर्थ आराधना केंद्र त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, महाद्वार रोड येथे आल्यावर भव्य स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पालखीचे स्वागत उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नितीन जाधव, नगरसेविका नेत्रावती भागवत, पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर व व्हा चेअरमन सुवर्णा शहापूरकर, मराठा बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील, व्हॉईस चेअरमन शेखर हंडे, दैवज्ञ बँकेचे व्हाईस चेअरमन मंजुनाथ शेठ, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, अनिल शहा, सी. के. पाटील, राजेंद्र कागवाड, भाऊ मंडोळकर व मारुती कडोलकर यांच्यासह विजया चौगुले, लक्ष्मी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महाद्वार रोड येथे पालखीचे पूजन झाल्यानंतर पालखी महाद्वार रोड, तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, हेमू कलानी चौक, शेरी गल्ली, शनी मंदिर, फुलबाग गल्लीतून तानाजी गल्लीत जाऊन स्वामी समर्थ आराधना केंद्रावर विसावली. या परिक्रमेत अनेक स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.
पालखीच्या अग्रभागी बँडपथक आणि हंदिगनूरच्या महिलांचे व पुरुषांचे भजनी मंडळ असा हा लवाजमा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. पालखी मार्गावर रांगोळ्या घालण्यात येत अनेक ठिकाणी सुहासिनीनी पाणी ओतून व आरती करून पालखीचे स्वागत केले. मार्गावर नागरिकांनी फळांचे वाटप केले तर काहींनी पुष्पवृष्टी केली. रात्री सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वामी समर्थ आराधना केंद्राचे नारायण पाटील, सुनिल चौगुले, विकास मजूकर, संजीव बर्डे, राजेश गोजगेकर संजू हिशोबकर, रवी मोरे, प्रसाद नार्वेकर, रवी हुलजी, राहुल मुचंडी, वसंत पाटील, मधु गुरव, दया कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
0 Comments