हुक्केरी / वार्ताहर
घटप्रभा नदीत कार कोसळून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेनकोळी (ता. हुक्केरी ; जि. बेळगाव) येथे मंगळवारी सायंकाळी किंवा रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. किरण लक्ष्मण नवलगी (वय ४५, रा. दड्डी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे मृत चालकाचे नाव असून तो सलून (केशकर्तनालय) व्यावसायिक होता.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, दि. ३० डिसेंबर रोजी किरण कार घेऊन कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. उद्योगातील नुकसानीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गाडी आणि मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिसस्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
0 Comments