खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील रुमेवाडी क्रॉसजवळ बसचा पत्रा तुटल्याने महिला चालत्या बसमधून खाली पडल्याची घटना घडली.
पद्मिनी भुजंग कदम (वय ६५ वर्षे रा. निडगळ ,ता. खानापूर) असे जखमी महिलेचे आहे. खानापूर आगाराच्या बसमधून ती प्रवास करत असताना रुमेवाडी क्रॉसजवळ चालत्या बसमधून लोखंडी पत्रा कट झाल्याने ती खाली पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र खानापूर मार्ग परिवहन महामंडळाविरोधात नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या जुन्या बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देऊ नयेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
0 Comments