• पुढील तीन वर्षे असेल कार्यकाळ

दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा  दि. ११ डिसेंबरपासून पदभार स्वीकारणार असून पुढील तीन वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ असणार आहे. कॅबिनेटच्या समितीने महसूल सचिव पदी असलेल्या संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी निवड केली आहे.





सध्याचे रिझर्व्ह बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या, १० डिसेंबर रोजी संपत आहे. संजय मल्होत्रा हे १९९० च्या राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये ते आरईसीचे चेअरमन आणि एमडी या पदावर नियुक्त झाले. त्याआधी ते उर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते. २०२२ मध्ये डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे सचिव या पदावर ते कार्यरत होते. संजय मल्होत्रा यांना केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या संचालक पदीही नियुक्त केले होते. आता त्यांना आरबीआयचे गव्हर्नर हे पद देण्यात आले आहे.