• सुवासिनी मंगल कार्यालय, वडगाव पुणे येथे आयोजन 

पुणे दि. ८ डिसेंबर / (परशराम निलजकर) 

खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेच्या माध्यमातून सर्व उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्योगसंबंधित उपक्रमांची व्याख्यानमाला हाती घेण्यात आलेली आहे. त्याचाच पहिला भाग म्हणून गुरूवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता सुवासिनी मंगल कार्यालय, वडगाव पुणे या ठिकाणी उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. 

खानापूर - बेळगाव, रामनगर, अळणावर,हल्याळ आदी भागांतून केवळ पोटा-पाण्यासाठी काहीतरी करणे या मापक आणि अंधूकशा आशेने सुमारे ५०० कि. मी. अंतरावरून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. प्रसंगी परिस्थितीशी दोन हात करता करता पराकोटीचा संघर्षही करावा लागला. कालानुरूप प्राप्त अनुभवातून स्वतःचे व्यवसाय निर्माण करून भक्कम स्थान निर्माण करण्याबरोबरच दुसऱ्यांच्या पोटापाण्यासाठीही कवाडे खुली केलात आणि हळूहळू आपल्या व्यवसायात उत्तुंग झेपही घेतलात.

पण बदलत्या काळात उद्योग जगतातील परिस्थितीही बदलली. नवनवीन आवाहने निर्माण झाली. सर्वतऱ्हेने सक्षम असूनही म्हणावी तशी प्रगती होत नाही. काहींजणांची प्रगती झालेली असली तरीही अजून त्यांच्यात आकाशाला गवसणी घालायची कुवत दडलेली असू शकते. अशा सर्वच बाबींचा सखोल विचार करून आपल्या सर्व उद्योजकांना प्राप्त परिस्थितीनुसार प्रशिक्षित करण्याचा मंडळाचा मानस आहे. म्हणूनच मंडळाने उद्योगसंबंधित उपक्रमांची व्याख्यानमाला सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

  • मेळाव्याचे  मुख्य हेतू खालीलप्रमाणे आहेत : 

१) आत्तापर्यंत आपल्या व्यवसायामध्ये कौतुकास्पद आणि अभिमानास्पद कार्य केलेल्या उद्योजकांना यापुढेही व्यवसाय वृद्धीसाठी योग्य प्रकारे प्रशिक्षित करणे.

२) नव्याने उदयास आलेल्या/सुरू केलेल्या व्यवसायिकांना गरजेपुरता लागणारे व्यावसायिक ज्ञान देणे

३) GROWTH MINDSET ही संकल्पना अंगीकारून बौद्धिक, आर्थिक, सामाजिक आदी बाबींमध्ये विकास साधणे.

४) कंपनीला आवश्यक Shot Term Policies, Long Term Policies, Vision, Mission, Core Values आदी गोष्टी परिभाषित करून आपल्या व्यवसायाला सुरळीतपणे आणि विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जाणे.

५) व्यवसायामध्ये नेहमीच येणाऱ्या समस्या उदा. उत्पादीत होणाऱ्या वस्तूंना असणारी कमी मागणी, खेळत्या भांडवलाचा तुडवडा, कामगारांची उणीव, पायाभूत सुविधांचा अभाव इत्यादी बाबींवर मात करण्यासाठी उद्योजकांना योग्य ते मार्गदर्शन करणे.

६) व्यवसायामध्ये अचानकपणे उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आधीपासूनच संक्षम बनने.

७) खानापूर (बेळगाव) मधील पुणेस्थित व्यावसायिकांना एकत्रित करणे.

तरी सर्व खानापूर (बेळगाव) मधील पुणेस्थित व्यावसायिकांनी उद्योजक मेळाव्याला उपस्थित राहून या संधीचा अवश्य लाभ घ्यावा अशी नम्र विनंती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच Google Form मंगळवार दिनांक १०/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ६:०० पर्यंत भरून आपली नोंदणी करून सहकार्य करावे.

टीप : प्रवेश हा Google Form भरलेल्यानुसार दिला जाईल. (सदर माहिती कुठेही प्रसिद्ध केली जाणार नाही)

वरील सर्व मुद्द्यांवर व्यापक आणि परिणामकारक चर्चा करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक श्री भालचंद्र पुराणीक (Owner, Focuss Training and Development) आणि केशव जावळीकर (MD, GMJ Systems and Automation Pvt. Ltd.) यांची खालील सत्रांवर सविस्तर चर्चा आयोजित केलेली आहे.

१. Business Leadership  २. Business Strategy ३. HR ४. S&M ५. WCP ६. Finance

सदर मुद्द्यांवरील मार्गदर्शन एकमेकांशी संबंधित असल्याने सुरवातीपासून ऐकले तर उद्योजकांना त्याचा अधिक लाभ होईल. म्हणून कृपया वेळेतच म्हणजे दुपारी ठीक २:०० वाजता हजर राहावे, थेट मार्गदर्शनालाच सुरूवात होणार आहे असे आवाहन खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.