गुंजी / वार्ताहर
मातृभाषेच्या सर्व सरकारी शाळा वाचविणे टिकवणेसाठी वर्षभरापासून कार्यरत असलेल्या विश्वभारती कला आणि क्रीडा संघटना उपशाखा खानापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत शाळा सौलभ्या बरोबरच सर्व मातृभाषेच्या शाळा वाचविणे आणि जपण्यासाठी येत्या अधिवेशन काळात शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करण्याचा निर्धार नुकताच खानापुरातील इस्कॉन मंदिरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी विश्वभारती कला आणि क्रीडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल देसाई होते. सुरुवातीस सर्वांचे स्वागत करून बैठकीस प्रारंभ झाला.
यावेळी खानापूर तालुक्यातील विविध भागातून आलेल्या शाळा सुधारणा कमिटींचे अध्यक्ष व सदस्य तसेच शिक्षण प्रेमी यांनी आपापल्या भागातील शाळांच्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने शाळेची दुरुस्ती, शिक्षकांची गैरहजेरी, शिक्षकांची कमतरता, शैक्षणिक दर्जा व मध्यान्ह आहार आदी बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील शाळांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व त्यानंतर शैक्षणिक धोरणाविषयी गंभीरपणे चर्चा करून सर्व शाळांच्या समस्या निवारणासाठी शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी शिक्षण प्रेमी रवींद्र बिर्जे पुणे, थॉमस डिसोजा, मष्णू चोपडे, सुधाकर घाडी आमगाव, फिरोज पठाण, अभिजीत मुजावर, महंमद युनूस, विनोद गुरव , एलेन मारियान बोर्जेस, रेणुका गुरव यांच्यासह तालुक्यातील एसडीएमसी अध्यक्ष सदस्य व शिक्षण प्रेमी उपस्थित होते. राऊत यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments