खानापूर / प्रतिनिधी
मासेमारीसाठी तलावात गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील हंदूर येथे शनिवार (दि. १४) डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. माबुली हसनसाब काद्रोली (वय ४५ रा.हंदूर , ता.खानापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, माबुली हा नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी तलावाकडे गेला होता, मात्र त्यानंतर तो पुन्हा घरी परतला नाही. काही वेळाने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला.या घटनेमुळे हंदूर गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली मृत्युमुळे कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाल्याचे समजते.
0 Comments