विजयपुर : येथील पत्रकार राहुल आपटे यांची कन्या श्रद्धा आपटे हिला भगवदगीता अभियान 2024 च्या राज्यस्तरीय भव्य समारोप कार्यक्रमात भगवदगीता संस्कृत भाषण स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला बद्दल सन्मानित करण्यात आले.  विजयपुर येथील सोंडा स्वर्णवल्ली महासंस्थानचे श्री गंगाधरेंद्र, ज्ञानयोगाश्रमाचे श्री बसवलिंग स्वामीजी, सिंदगी सारंग मठाचे श्री यांच्यासह स्वामीजी आणि भगवदगीता अभियानाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सोंडा स्वर्णवल्ली महासंस्थान शिरसी, भगवदगीता अभियानातर्फे आयोजित स्पर्धेत श्रद्धा आपटे हिने संस्कृतमध्ये भगवदगीतावर भाषण करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.