विजयपूर / वार्ताहर 

विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी पोलिसांनी बंतनूर (ता. सिंदगी जि. विजयपूर) येथे एका शेतात छापा घालून अवैधरित्या पिकवलेला हिरवा गांजा जप्त केला. या प्रकरणी बसवराज पुजारी याला अटक करण्यात आली. 

एकूण १३३ किलो गांजा पिकवणाऱ्या बसवराजकडून ३३ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.  इंडी डीवायएसपींच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.