- भीम आर्मीच्या वतीने बेळगावात निदर्शने
बेळगाव / प्रतिनिधी
डॉ. आंबेडकरांच्या नावाचा जप करण्याऐवजी देवाचे स्मरण करा देव रक्षण करेल, संसदेत असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून हटवून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी भीम आर्मीच्यावतीने गुरुवारी बेळगावात तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच मंत्री अमित शहा यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला.
प्रारंभी शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून, तसेच प्रतिमा पायदळी तुडवून डॉ.आंबेडकरांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी महेश शिगीहळ्ळी म्हणाले, आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला कायदेशीर संरक्षण देणारे संविधान देऊन देशाचे रक्षण करण्याचे काम केले. देवाच्या रूपातील संविधान देशाचे रक्षण करत आहे. अमित शहा वारंवार संविधानविरोधी वक्तव्य करत आहेत. तेव्हा त्यांना गृहमंत्रीपदावरून हटवून पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली. तसे न केल्यास देशभरात हिंसक आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात भीम आर्मीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments