विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्याच्या तालिकोट तालुक्यातील बिळेभावी क्रॉसजवळ ताळीकोट पोलीस स्थानकाच्या हद्दीत कार आणि ऊस तोडणी यंत्र यांच्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. निंगाप्पा पाटील (वय ५५) शांतव्वा शंकर पाटील (वय ४५, रा. अलीबाद , ता. विजयपूर) भीमाशी संकनाळ (वय ६५) , शशिकला जैनापुर (वय ५०), दिलीप पाटील (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, यादगिरी जिल्ह्यातील अग्नी गावातून सर्वजण कन्या पाहून परतत असताना क्रुझरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार आणि तालिकोटहून हुनसगीकडे जाणाऱ्या मळणी यंत्राची समोरासमोर धडक होऊन ही दुर्घटना घडली. अपघातानंतर जेसीबीच्या सहाय्याने पाच जणांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी बसनबागेवाडी येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
0 Comments