- पोलिस महासंचालक आलोक मोहन यांचा आदेश
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव सुवर्णसौध, येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन काळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सीईन पोलीस निरीक्षक बी.आर.गड्डेकर यांना रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक आलोक मोहन यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. अधिवेशन काळात सातत्याने होणाऱ्या आंदोलना दरम्यान जनतेचे संरक्षण करणे ही पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी होती.
यामध्ये पोलीस निरीक्षक बी.आर.गड्डेकर यांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठेमुळे त्यांना १० हजार रु. रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
0 Comments