बेळगाव / प्रतिनिधी
मालमत्तेच्या वादातून त्रास देणाऱ्या दारुड्या मद्यपी त्याच्या मोठ्या भावाने ट्रॅक्टर अंगावर घालून हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी शहराच्या हद्दीत एका शेतात घडली.
बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी येथील गोपाळ बाविहाल (२७) याचा खून करण्यात आला. वारसाहक्काने मिळणाऱ्या मालमत्तेचा उपभोग घेऊ देणार नाही असे सांगून रोज दारू पिऊन त्रास देणाऱ्या आपल्या भावाला, त्याचा भाऊ मारुती बावीहाळ (वय 30) ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्याचा खून केला.
मयत गोपाल हा रोज दारू पिऊन तुम्हाला वारसाहक्काने मिळणाऱ्या मालमत्तेचा उपभोग घेऊ देणार नाही, अशी चिड असे. तसेच त्याच्या वाटणीला आलेला ट्रॅक्टर त्याच्या पत्नीच्या घरी ठेवला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून गोपाळचा चा दुचाकीवरून जात असताना खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गोपालचे वडील अर्जुन बावीहाळ यांना तीन मुलगे असून पंधरवड्यापूर्वीच त्यांच्याकडे आलेल्या जमिनीचा वाटा व पैसा त्यांना मिळाल्याचे दिसते. तीन भावांना प्रत्येकी एक ट्रॅक्टरचा वाटा मिळाला. मृत गोपाल हा ट्रॅक्टर पत्नीच्या घरी सोडल्याने गोंधळ झाल्याचीही माहिती आहे. मी काम करून कमावलेले पैसे बरबाद करीत आहेत, असे भावांमध्ये अनेकदा भांडण व्हायचे. मद्यपानाच्या आहारी गेलेल्या गोपाळचे वागणे कुटुंबीयांना पटत नव्हते. ट्रॅक्टरच्या वादावर दोन भावांमध्ये सकाळी झालेला वाद विकोपाला जाऊन, त्याच्या भावाने त्याला ठार मारण्याचा कट रचला. मारुती बाविहाळला मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन थांबलेल्या गोपाळने, मारुतीची दुचाकी यरगट्टी बाहेरील बुडीकोप्प रस्त्यावर येत असताना ट्रॅक्टरने त्याला धडक दिली आणि शेतात पडलेल्या मारुतीच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याने त्याचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरच्या धडकेने हे भीषण दृश्य स्थानिकांनी मोबाईलवर टिपले आहे. याप्रकरणी मुरगोड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments