चंदगड / लक्ष्मण यादव 

चंदगड तालुक्यातील मौजे मलतवाडी गावचे सुपुत्र वीर जवान कै. नाना वाकोजी पाटील देशाची सेवा बजावत असताना जम्मू कश्मीर येथे शहीद झाले.महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापन करायचे असल्याने आमदार शिवाजीराव पाटील मुंबईला गेले असल्याने त्यांना अंत्यविधीसाठी जाता आले नाही. 

पण ११ डिसेंबर रोजी मतदारसंघात परतल्यानंतर त्यांनी शहीद जवान कै. नाना वाकोजी पाटील यांच्या कुटुंबाची धावती भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांच्या अडीअडचणीत कायम सोबत राहणार अशी ग्वाही दिली.

यावेळी मलतवाडी गावचे माजी सैनिक गजानन पाटील,सामाजिक कार्यकर्ते मायाप्पा सत्तू पाटील, सुनील ओऊळकर अशोक थोरात उपस्थित होते.