येळळूर, ता. २६ :  येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने २० वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन  रविवार (ता. ५) जानेवारी रोजी होणार आहे. या संमेलनाची मुहूर्तमेढ  शनिवार (ता. २८) रोजी प्राथमिक मराठी शाळा येळळूरवाडीच्या पटांगणावर अभियंते व उद्योजक हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांच्या हस्ते  रोवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य परशुराम भाऊ नंदीहळळी असणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य शामराव पाटील हे असणार आहेत. 

या कार्यक्रमाला येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन गोरल, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक वाय. एन. मजुकर, गावातील सर्व सहकारी संस्थांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, गावातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शाळा सुधारणा समिती सदस्य, गावातील विविध संघ - संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे,असे आवाहन येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.