निपाणी / प्रतिनिधी 

प्रेम नाकारल्याचा राग मनात धरून तरुणाने प्रेम करणाऱ्या मुलीच्या आईची आणि भावाची हत्या केल्याची घटना निपाणी तालुक्यातील अकोळ गावात घडली.

मंगला नाईक (वय ४५) आणि प्रज्वल नाईक (वय १८) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. निपाणी तालुक्याच्या अकोळ गावातील एका घरात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने लोक हादरून गेले.

रवीने हा गुन्हा केल्याची माहिती आहे. त्याचे एका तरुणीवर प्रेम होते. पण त्याच्या घरच्यांचा त्याच्या प्रेमाला खूप विरोध होता. कोणत्याही कारणास्तव लग्नाला परवानगी न मिळाल्याने ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेसंदर्भात आरोपी रवी आणि खून झालेल्या मंगला यांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, निपाणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.