• सुदैवाने जीवितहानी टळली   

बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्यानजीक खड्ड्यात उलटली. नावगे (ता. बेळगाव) येथे बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सदर बस नावगे गावातून बेळगावकडे जात होती. अपघात झाला त्यावेळी बसमधून फक्त चार प्रवासी प्रवास करत होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.