सौंदत्ती / वार्ताहर 

कचरावाहक वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन कालव्यात कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहराच्या हद्दीत मलप्रभा नदीच्या डाव्या बाजूला असलेल्या बाळेकुंदर्गी कालव्याच्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. 

गदिगेप्पा कामन्नवर (वय ४८) असे मृत चालकाचे नाव आहे. तर मदतनीस मंजुनाथ सिंगणा बचावला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.