बेळगाव / प्रतिनिधी
विजेचा खांब दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला. सोमवार (दि. ३०) डिसेंबर रोजी रात्री खासबाग बसवाण गल्ली येथे ही घटना घडली.
हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याची तक्रार दुचाकी मालकाने केली आहे. यापूर्वी हेस्कॉमच्या निदर्शनास अनेकदा आणूनही भूमिगत केबल टाकल्यानंतर पोल न हटविल्याने ही दुर्घटना घडली असून, हेस्कॉमने नुकसान भरपाई देण्याची मागणी दुचाकी मालकाने केली आहे.
0 Comments