बेळगाव / प्रतिनिधी
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी भाजप आमदार सी.टी.रवी यांना अटक करण्यात आली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात सीटी रवी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीएनएस कायदा 75 आणि 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल होताच हिरेबागेवाडी पोलिसांनी सुवर्णसौध येथून सीटी रवी यांना अटक केली.
0 Comments