बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथे गांधी भारत कार्यक्रमाला आल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेले राजस्थानचे राज्यसभा सदस्य नीरज डांगे यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
बेळगाव येथे १९२४ मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी कार्यक्रमाला आलेले राजस्थानचे राज्यसभा सदस्य नीरज डांगे हे सध्या आजारपणामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंत्री केजे जॉर्ज, सतीश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य डॉ. यतींद्र सिद्धरामय्या, नटराज जानकीराम आदींचा सहभाग होता.
0 Comments