• जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार

बेळगाव / प्रतिनिधी 

मूळची येळ्ळूर आणि सध्या समृद्धी कॉलनी येथील रहिवासी ममता चिठ्ठी (वय ३१) हिचे रविवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. तिच्या निधनानंतर डॉ. संपत पाटील यांनी जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांच्याशी संपर्क साधला व देहदानाविषयी कल्पना दिली.  त्यानंतर बामणे यांनी जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाशी संपर्क साधला आणि देहदानाचे सोपस्कार पूर्ण केले. तिच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

परशराम चिठ्ठी कुटुंबियांच्या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार असून जायंट्स आय फौंडेशन आणि जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.