उडुपी / वार्ताहर
कर्नाटकात लागू करण्यात आलेल्या पाच हमी योजनांचे इतर राज्येही अनुकरण करत असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. उडुपी तालुका पंचायतीमध्ये तालुकास्तरीय हमी योजना अंमलबजावणी समिती कार्यालयाचे उद्घाटन करताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, भारताच्या इतिहासात अशा हमी योजना राबविल्याचा आपल्या सरकारला अभिमान आहे.
कर्नाटक राज्य सरकारच्या हमी योजनांचे मॉडेल इतर राज्यांमध्येही राबवले जात आहेत. भारताच्या परिवर्तनात काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे. काँग्रेस सरकार महिला सक्षमीकरणासाठी चांगले काम करत आहे. अंमलबजावणी समित्यांनी पाच हमी योजनांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवावे आणि राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या.
यावेळी माजी खासदार जयप्रकाश हेगडे, उडुपी तालुकास्तरीय हमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष रमेश कांचन, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक कोडावूर, यूडीएचे अध्यक्ष दिनकर हेरूर, जिल्हाधिकारी डॉ.के.विद्याकुमारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. के.अरुण, जिल्हा पंचायतचे सीईओ प्रतिक पाटील यांच्यासह काँग्रेस नेते उदयकुमार शेट्टी, प्रसाद कांचन, एम.ए.गफूर, दिनेश हेगडे, लावण्य बल्लाळ आदींसह अनेकजण उपस्थित होते.
0 Comments