बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या सहावर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या जायंट्स आय फौंडेशनच्या अध्यक्षपदी संस्थापक मदन बामणे यांची निवड करण्यात आली आहे. समाजाला नेत्रदान , त्वचादान आणि देहदानाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना या समाजोपयोगी कार्य करण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य फौंडेशनच्या माध्यमातून करण्यात येते.
मदन बामणे हे गेल्या अठरा वर्षांपासून जायंट्सच्या माध्यमातून नेत्रदान देहदानाचे कार्य करत असून आगामी काळात प्रत्येक विभागात फिरून या पवित्र दानाचे महत्त्व सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शनिवारी सायंकाळी मावळते अध्यक्ष शिवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जायंट्स भवन येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी दहा जणांची विस्तारित कमिटी नेमण्यात आली. यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून मदन बामणे यांची तर शिवराज पाटील, उमेश पाटील, अशोक हलगेकर, संजय पाटील, विजय बनसुर अजित कोकणे प्रदिप चव्हाण राहुल बेलवलकर पद्मप्रसाद हुली यांची संचालकपदी निवड झाली आहे. यावेळी अनंत लाड, सुनिल मुतगेकर, अविनाश पाटील व लक्ष्मण शिंदे आदि उपस्थित होते.
0 Comments